Devi Ekveera
एकवीरा देवी आरती

आरती एकवीरा | देवी देई मज वरा ।
शरण मी तूजलागी| देई दर्शन पामरा ।
आरती एकवीरा ॥ धृ.॥

कार्ला गडी वास तुझा | भक्त सह्याद्रीच्या पायीं॥
कृपा दृष्टीने पाहोनी| सांभाळिसी लवलाही॥ १ ॥

चैत्राच्या शुद्ध पक्षी | जेव्हा उत्सव तव होई ॥
भक्तगण मिळताती | पालखीतें मिरवती ॥ २ ॥

दर्यावरचे शूरवीर । तुझ्या पायीचे चाकर ॥
तव कृपा तारी त्यासीं । त्याना तुझाची आधार ॥ ३ ॥

हस्तनक्षत्राचा वारा | ऊठे जिवा नाही थारा ॥
क्षण एक आठवितां । त्यासी तारिसी तूं माता ॥ ४ ॥

तव पुजनीं जे रमती | मनोभावें स्मरोनी चित्तीं ॥
जड संकटाचे वेळी । कडाडोनी प्रकट होसी ॥ ५ ॥

शांत होई तृप्त होई । सेवा मान्य करी आई ॥
अभयाचा देई वर । ठेवी तव चरणी मी शीर ॥ ६ ॥

------------------------------------------------------------------

।एकवीरा देवीची आरती।

येई हो एकवीरा देवी माझे माऊली ये ।
माझे माऊली ये ॥
दोन्ही कर जोडुनि तुमची वाट मी पाहे ॥ धृ. ॥

आलीया गेलीया अंबे धाडी निरोप ।
कार्ल्यामध्ये आहे माझी एकवीरा माय ॥ १ ॥

पिवळी साडी ही अंबे कैसी गगनी झळकली ॥
व्याघ्रावरी बैसोनी माझी एकवीरा देवी आली ॥ २ ॥

एकवीरेचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
एकवीरा देवी नाम तुमचे भावे ओवाळी ।
येई हो एकवीरा देवी. ॥ ३ ॥