Kapur Aarati
कर्पूरगौरं करुणावतारं
संसारसारं भुजगेन्द्रहारम्
सदा वसं तं हृदयारविन्दे
भवं भवानिसहितं नमामि ।

मन्दारमाला कुलतालकायै
कपालमालांकित शेखराय
दिव्याम्बरायै च दिगंबराय
नम: शिवायै च नम: शिवाय।।

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरती झाल्यावर कर्पूर आरती म्हटली जाते. सर्व साधारणपणे आपल्याला ह्या सर्वच आरत्या ऐकून ऐकून पाठ झाल्या आहेत. मात्र त्यामुळे बरेचदा चुकीचे उच्चार ही केल्या जातात. मुख्य आरतीनंतर 'कर्पूर आरती' म्हणून म्हटल्या जाणा-या या आरतीचा कापूराशी काही संबंध नाही. केवळ सुरुवात 'कर्पूर' शब्दाने होते इतकेच.

हे शिवपार्वतीचे एक अतिशय सुरेख स्तवन आहे. अर्थानुसंधान ठेवले तर या स्तवनाने अधिक आनंद मिळतो.

कापूराप्रमाणे शुभ्र, पवित्र असलेली गौरवर्णा म्हणजेच पार्वती व करुणेचा साक्षांत अवतार असलेले, संपूर्ण संसाराचे सार असलेले, भुजंगाचा हार परिधान करणारे म्हणजेच शिव शंकर तुम्ही माझ्या हृदयकमलात सदा निवास करावा म्हणून शिव शंकरांना पार्वतीसह नमन करतो, वंदन करतो.

मंदार पुष्पकलिकांच्या मालांनी सुशोभित अशी पार्वती आणि नरमुंडमाला परिधान केलेले शिवशंकर (ज्यांनी दिव्य वस्त्र परिधान केलेले आहे आणि जे दिगंबर आहेत) , त्या शिव आणि शिवा (पार्वती) या दोघांना मी नमन करतो, पुनःपुन्हा नमन करतो.