ब्रह्ममुरारि सुरार्चित लिङ्गं
निर्मलभासित शोभित लिङ्गम् ।
जन्मज दुःख विनाशक लिङ्गं
तत्प्रणमामि सदाशिव लिङ्गम् ॥ १ ॥
देवमुनिप्रवरार्चित लिङ्गं
कामदहं करुणाकर लिङ्गम् ।
रावणदर्प विनाशक लिङ्गं
तत्प्रणमामि सदाशिव लिङ्गम् ॥ २ ॥
सर्वसुगन्ध सुलेपित लिङ्गं
बुद्धिविवर्धन कारण लिङ्गम् ।
सिद्धसुरासुर वन्दित लिङ्गं
तत्प्रणमामि सदाशिव लिङ्गम् ॥ ३ ॥
कनकमहामणि भूषित लिङ्गं
फणिपतिवेष्टित शोभित लिङ्गम् ।
दक्षसुयज्ञ विनाशक लिङ्गं
तत्प्रणमामि सदाशिव लिङ्गम् ॥ ४ ॥
कुङ्कुमचन्दन लेपित लिङ्गं
पङ्कजहार सुशोभित लिङ्गम् ।
सञ्चितपाप विनाशक लिङ्गं
तत्प्रणमामि सदाशिव लिङ्गम् ॥ ५ ॥
देवगणार्चित सेवित लिङ्गं
भावैर्भक्तिभिरेव च लिङ्गम् ।
दिनकरकोटि प्रभाकर लिङ्गं
तत्प्रणमामि सदाशिव लिङ्गम् ॥ ६ ॥
अष्टदलोपरिवेष्टित लिङ्गं
सर्वसमुद्भव कारण लिङ्गम् ।
अष्टदरिद्र विनाशक लिङ्गं
तत्प्रणमामि सदाशिव लिङ्गम् ॥ ७ ॥
सुरगुरु सुरवर पूजित लिङ्गं
सुरवनपुष्प सदार्चित लिङ्गम् ।
परात्परं परमात्मक लिङ्गं
तत्प्रणमामि सदाशिव लिङ्गम् ॥ ८ ॥
फलश्रुतिः
लिङ्गाष्टकमिदं पुण्यं
यः पठेच्छिवसन्निधौ ।
शिवलोकमवाप्नोति
शिवेन सह मोदते ॥
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मराठी अर्थ :
ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि सर्व देवता ज्याची पूजा करतात, जे निर्मळ तेजाने प्रकाशित व शोभायमान आहे आणि जन्म-मृत्यूच्या चक्रातून निर्माण होणाऱ्या सर्व दुःखांचा नाश करते, त्या सदाशिवलिंगाला मी नमस्कार करतो. ॥१॥
श्रेष्ठ देवता व महान ऋषी-मुनी ज्याची पूजा करतात, ज्याने कामदेवाचे दहन केले, जो करुणेचा सागर आहे आणि ज्याने रावणाच्या अहंकाराचा नाश केला, त्या सदाशिवलिंगाला मी नमस्कार करतो. ॥२॥
विविध सुगंधी द्रव्यांनी अभिषिक्त व अलंकृत असलेले, बुद्धी व विवेक वाढविणारे आणि ज्याला सिद्धपुरुष, देव व असुरसुद्धा वंदन करतात, त्या सदाशिवलिंगाला मी नमस्कार करतो.॥३॥
सुवर्ण व मौल्यवान रत्नांनी सुशोभित, नागराजाने वेढलेले आणि दक्ष प्रजापतीच्या अहंकारयुक्त यज्ञाचा विनाश करणाऱ्या त्या सदाशिवलिंगाला मी नमस्कार करतो. ॥४॥
सुवर्ण व मौल्यवान रत्नांनी सुशोभित, नागराजाने वेढलेले आणि दक्ष प्रजापतीच्या अहंकारयुक्त यज्ञाचा विनाश करणाऱ्या त्या सदाशिवलिंगाला मी नमस्कार करतो.॥५॥
देवगण ज्याची पूजा व सेवा करतात, जो केवळ शुद्ध भाव व भक्तीने प्रसन्न होतो आणि ज्याचे तेज कोट्यवधी सूर्यांप्रमाणे प्रकाशमान आहे, त्या सदाशिवलिंगाला मी नमस्कार करतो. ॥६॥
अष्टदल कमळाने वेढलेले, संपूर्ण सृष्टीच्या उत्पत्तीचे मूळ कारण असलेले आणि जीवनातील आठ प्रकारच्या दारिद्र्यांचा नाश करणाऱ्या त्या सदाशिवलिंगाला मी नमस्कार करतो.॥७॥
देवगुरू बृहस्पती आणि श्रेष्ठ देवता ज्याची पूजा करतात, जे दिव्य पुष्पांनी सतत पूजले जाते आणि जे सर्वश्रेष्ठ, सर्वांच्या पलीकडील परमात्मस्वरूप आहे, त्या सदाशिवलिंगाला मी नमस्कार करतो.॥८॥
फलश्रुति
जो भक्त भगवान शिवांच्या सान्निध्यात श्रद्धा व भक्तीभावाने या पवित्र लिंगाष्टकाचे पठण करतो, तो शिवलोकाची प्राप्ती करतो आणि भगवान शिवांच्या कृपेने दिव्य आनंदाचा अनुभव घेतो. ॥९॥ ॥ हर हर महादेव ॥