Shree Hanuman Chalisa
॥ दोहा ॥
श्री गुरु चरन सरोज रज, निज मन मुकुर सुधारि।
बरनउं रघुबर विमल जसु, जो दायकु फल चारि॥

बुद्धिहीन तनु जानिकै, सुमिरौं पवन-कुमार।
बल बुद्धि विद्या देहु मोहिं, हरहु कलेश विकार॥

॥ चौपाई ॥
जय हनुमान ज्ञान गुण सागर। जय कपीस तिहुँ लोक उजागर॥
राम दूत अतुलित बल धामा। अंजनि-पुत्र पवनसुत नामा॥

महावीर विक्रम बजरंगी। कुमति निवार सुमति के संगी॥
कंचन बरन बिराज सुवेसा। कानन कुण्डल कुंचित केसा॥

हाथ वज्र औ ध्वजा बिराजै। काँधे मूँज जनेऊ साजै॥
शंकर स्वयं केसरीनंदन। तेज प्रताप महा जग वन्दन॥

विद्यावान गुणी अति चातुर। राम काज करिबे को आतुर॥
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया। राम लखन सीता मन बसिया॥

सूक्ष्म रुप धरि सियहिं दिखावा। विकट रुप धरि लंक जरावा॥
भीम रुप धरि असुर संहारे। रामचन्द्र के काज संवारे॥

लाय सजीवन लखन जियाये। श्रीरघुवीर हरषि उर लाये॥
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई। तुम मम प्रिय भरतहि सम भाई॥

सहस बदन तुम्हरो यश गावैं। अस कहि श्रीपति कंठ लगावैं॥
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा। नारद सारद सहित अहीसा॥

जम कुबेर दिकपाल जहां ते। कवि कोबिद कहि सके कहां ते॥
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा। राम मिलाय राज पद दीन्हा॥

तुम्हरो मन्त्र विभीषन माना। लंकेश्वर भये सब जग जाना॥
जुग सहस्र योजन पर भानू। लील्यो ताहि मधुर फल जानू॥

प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं। जलधि लांघि गए अचरज नाहीं॥
दुर्गम काज जगत के जेते। सुगम अनुग्रह तुम्हरे तेते॥

राम दुआरे तुम रखवारे। होत न आज्ञा बिनु पैसारे॥
सब सुख लहै तुम्हारी सरना। तुम रक्षक काहू को डरना॥

आपन तेज सम्हारो आपै। तीनों लोक हांक तें कांपै॥
भूत पिशाच निकट नहिं आवै। महावीर जब नाम सुनावै॥

नासै रोग हरै सब पीरा। जपत निरंतर हनुमत बीरा॥
संकट ते हनुमान छुड़ावै। मन क्रम वचन ध्यान जो लावै॥

सब पर राम राय सिरताजा। तिन के काज सकल तुम साजा॥
और मनोरथ जो कोई लावै। सोइ अमित जीवन फल पावै॥

चारों जुग परताप तुम्हारा। है परसिद्ध जगत उजियारा॥
साधु संत के तुम रखवारे। असुर निकन्दन राम दुलारे॥

अष्ट सिद्धि नव निधि के दाता। अस वर दीन जानकी माता॥
राम रसायन तुम्हरे पासा। सादर हो रघुपति के दासा॥

तुम्हरे भजन राम को पावै। जनम जनम के दुख बिसरावै॥
अन्तकाल रघुबर पुर जाई। जहाँ जन्म हरि-भक्त कहाई॥

और देवता चित्त न धरई। हनुमत सेई सर्व सुख करई॥
संकट कटै मिटै सब पीरा। जो सुमिरै हनुमत बलबीरा॥

जय जय जय हनुमान गोसाई। कृपा करहु गुरुदेव की नाई॥
जो शत बार पाठ कर कोई। छूटहि बंदि महासुख होई॥

जो यह पढ़ै हनुमान चालीसा। होय सिद्धि साखी गौरीसा॥
तुलसीदास सदा हरि चेरा। कीजै नाथ ह्रदय महँ डेरा॥

॥ दोहा ॥
पवनतनय संकट हरन, मंगल मूरति रुप।
राम लखन सीता सहित, ह्रदय बसहु सुर भूप॥

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठी अर्थ:

गुरुंच्या पवित्र चरणधुळीने आपल्या मनरूपी आरश्याला स्वच्छ करून मी श्रीरामांच्या पवित्र यशाचे वर्णन करतो, जे चारही फलांची (धर्म, अर्थ, काम, मोक्ष) प्राप्ती करून देणारे आहे.

हे पवनपुत्र हनुमानजी! मला बुद्धिहीन आणि दुर्बल जाणून, मी आपले स्मरण करतो आहे. मला बल, बुद्धी आणि विद्या द्या आणि माझे सर्व क्लेश आणि दोष दूर करा.

हनुमानजींना वंदन असो, जे ज्ञान आणि गुणांचे महासागर आहेत. वानरांचे अधिपती हनुमानजींची कीर्ती तिन्ही लोकांत (स्वर्ग, पृथ्वी, पाताळ) आहे. रामाचे दूत, अतुलनीय बलाचे धाम असलेल्या हनुमानजींना वंदन असो. ते अंजनीच्या पुत्र आणि पवनदेवाचे (वायुदेवाचे) सुपुत्र म्हणून ओळखले जातात.

महावीर, पराक्रमी आणि बजरंग बली हनुमानजींना वंदन असो. ते दुष्ट विचारांचा नाश करणारे आणि सद्विचारांचा संग करणारे आहेत. त्यांचा शरीराचा रंग सुवर्णासारखा तेजस्वी आहे, आणि ते सुंदर वस्त्रांनी सुशोभित आहेत. त्यांच्या कानांमध्ये कुंडल चमकत आहेत आणि त्यांचे केस कुंचित (घोंगडेलेले) आहेत.

त्यांच्या हातात वज्र आणि ध्वजा सजलेले आहेत, आणि खांद्यावर जानवे व्यवस्थित ठेवले आहे. भगवान शंकराचे अवतार केसरीपुत्र (हनुमान) आहेत आणि त्यांच्या तेज आणि प्रभावामुळे जगभर त्यांची पूजा आणि आदर केला जातो.

हनुमानजी अत्यंत विदयावान, गुणी, बुद्धिमान, कुशल आणि तल्लख आहेत. ते रामाच्या कामासाठी नेहमी तत्पर असतात. ते प्रभु रामाच्या चरित्राचे श्रवण करणारा रसिक आहेत आणि राम, लक्ष्मण, आणि सीतेच्या मनामध्ये वास करतात.

हनुमानजी आपल्या सूक्ष्म रूपात सीतेला दर्शन देतात, तर विकट रूप धारण करून लंकेला जाळतात. त्यांनी भीम रूप धारण करून असुरांचा संहार केला आणि रामचंद्रजींच्या सर्व कार्ये पूर्ण केली.

हनुमानजींनी संजीवनी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले आणि आनंदी होऊन श्रीरामाने आपल्याला हृदयाशी लावले.श्रीरामांनी हनुमानजींची अत्यंत स्तुती केली. ते म्हणाले, “हे हनुमान, तू मला भरतासारखा प्रिय आहेस. तू माझा खरा बंधू आहे

श्रीराम म्हणतात की, “हजारो मुखांनीही तुझं यश गात राहिलं तरी ते पुरेसं नाही.” हे बोलून त्यांनी हनुमानाला आपुलकीने मिठीत घेतलं.

सनक, सनंदन, ब्रह्मा, नारद, सरस्वती आणि शेषनाग – सर्वच महर्षी, देवता आणि ज्ञानी व्यक्ती हनुमानजींची कीर्ती गातात. यमराज, कुबेर व इतर दिक्पाल (दिशांचे रक्षक) सुद्धा हनुमानजींच्या गुणांचे संपूर्ण वर्णन करू शकत नाहीत. कोणताही बुद्धिमान कवीही त्याचं यथार्थ वर्णन करू शकत नाही.

हनुमानजींनी सुग्रीवावर उपकार केला. रामाची भेट घडवून दिली आणि त्याला पुन्हा वानरराज्य प्राप्त करून दिलं.

विभीषणाने तुमचं म्हणणं ऐकून रामाची सेवा पत्करली, त्यामुळे तो लंकेचा राजा झाला – हे संपूर्ण जग जाणतं.

हनुमानजींनी रामाची मुद्रिका तोंडात ठेवली आणि समुद्र पार केला – त्यांच्यासाठी ही काहीच अचंब्याची गोष्ट नव्हती.

जगातील सर्व कठीण कामं हनुमानजींच्या कृपेने सहज होतात.जो कोणी तुमच्या आश्रयाला येतो, त्याला सर्व सुख प्राप्त होतं. तुम्ही रक्षण करत असल्यावर कोणाचंही भय उरत नाही.

तुम्ही स्वतःचं तेज नियंत्रित करत असता, पण तुमची गर्जना ऐकून तीनही लोक (स्वर्ग, पृथ्वी, पाताळ) थरथरतात.

महावीर हनुमानजींचं नाव जिथे घेतलं जातं, तिथे भूत-प्रेत, वाईट आत्मा, किंवा कुठलाही अशुभ प्रभाव जवळ येत नाही.

जो सतत हनुमानजींचं स्मरण करतो, त्याचे रोग, वेदना, क्लेश नष्ट होतात.

जो मनाने, वाणीने आणि कृतीने हनुमानजींचं स्मरण करतो, त्याचं सर्व संकट हनुमानजी दूर करतात.

राम हे सर्वांच्या अधिपती आहेत, आणि त्यांच्या भक्तांचं सर्व कार्य तुम्ही पूर्ण करता.

जो कोणी भक्त हनुमानजींना श्रद्धेने प्रार्थना करतो, त्याला अनंत जीवनफल, म्हणजे खूप लाभ होतो.

चारही युगांत (सत्य, त्रेता, द्वापार, कलियुग) तुमचं तेज प्रकाशित आहे. संपूर्ण जगात तुमची कीर्ती आणि प्रभाव आहे.

तुम्ही संत-महात्म्यांचे रक्षक आहात, राक्षसांचा नाश करणारे आणि श्रीरामाला अत्यंत प्रिय आहात.

तुम्हाला आठ सिद्धी (जसे लघुता, महिमा, प्राप्ती, इ. अद्भुत शक्ती) आणि नव निधी (नव प्रकारचे धन) प्रदान करणारा वर माता जानकीने (सीतेने) दिला.

तुमच्याकडे रामभक्तीचं अमृत आहे. तुम्ही सदैव श्रीरामाचे नम्र भक्त राहता.

तुमचं भजन केल्याने श्रीराम प्राप्त होतात, आणि जन्मोजन्मीचं दुःख विसरलं जातं.

मृत्यूप्रसंगी भक्त हनुमानजींच्या कृपेने श्रीरामाच्या नगरीत (अयोध्येत) जातो आणि पुढच्या जन्मातही हरिभक्त म्हणून जन्म घेतो.

इतर देवतांवर मन न लावता फक्त हनुमानाची सेवा केली, तरी सर्व सुखं प्राप्त होतात.

जो कोणी बलशाली हनुमानजींचं श्रद्धेने स्मरण करतो, त्याचं सर्व संकट आणि पीडा दूर होतात.

तुमचं कृपाछत्र माझ्यावर सदैव राहो, जसं गुरू आपल्या शिष्यावर ठेवतो.

जो कोणी हनुमान चालीसाचं शंभर वेळा पठण करतो, त्याला सर्व बंधनातून मुक्तता आणि महासुख प्राप्त होतं.

जो हनुमान चालीसा भक्तिभावाने वाचतो, त्याला सिद्धी प्राप्त होते आणि याची साक्ष स्वतः भगवान शंकर देतात.

तुलसीदास सदा श्रीरामाचा दास आहे, हे नाथ (हनुमानजी), कृपया माझ्या हृदयातच वास करा.

हे पवनपुत्र! तू संकट दूर करणारा आणि मंगलमूर्ती आहेस. राम, लक्ष्मण आणि सीतेसह, माझ्या हृदयात सदैव वास कर.हृदयाशी लावले.