॥ श्री महालक्ष्म्यष्टकम् ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥
नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते।
शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते॥१॥
नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरि।
सर्वपापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते॥२॥
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि।
सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते॥३॥
सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि।
मन्त्ररूपे सदा देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते॥४॥
आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि।
योगजे योगसम्भूते महालक्ष्मि नमोऽस्तुते॥५॥
स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे।
महापापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते॥६॥
पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि।
परमेश्वरी जगन्मातः महालक्ष्मि नमोऽस्तुते॥७॥
श्वेताम्बरधारी देवि नानालङ्कारभूषिते।
जगत्स्थिते जगन्मातः महालक्ष्मि नमोऽस्तुते॥८॥
महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेद्भक्तिमान्नरः।
सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा॥९॥
एककालं पठेन्नित्यं महापापविनाशनम्।
द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः॥१०॥
त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम्।
महालक्ष्मिर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा॥११॥
॥ इति इन्द्रकृतं श्रीमहालक्ष्म्यष्टक-स्तोत्रं सम्पूर्णम् ॥
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मराठी अर्थ:
| श्री गणेशाय नमः |
हे महामाये, श्रीपिठावर विराजमान होणाऱ्या, देवांनी पूजलेल्या,
शंख, चक्र, गदा हातात धरलेल्या महालक्ष्मी, तुला वंदन असो!
गरुडावर आरूढ झालेल्या, कोलासुराला ( हा अत्यंत शक्तिशाली आणि दुष्ट असुर होता त्याचा पराभव महालक्ष्मीने केला) भय दाखवणाऱ्या,
सर्व पापे नष्ट करणाऱ्या देवी महालक्ष्मी, तुला वंदन असो!
सर्वज्ञ, सर्व वर देणाऱ्या, सर्व दुष्टांचा नाश करणाऱ्या,
सर्व दुःख दूर करणाऱ्या देवी महालक्ष्मी, तुला वंदन असो!
सिद्धी आणि बुद्धी प्रदान करणाऱ्या देवी, भुक्ती-मुक्ती देणाऱ्या,
मंत्रस्वरूप असणाऱ्या, सदा देवी महालक्ष्मी, तुला वंदन असो!
आदी आणि अंत न दिसणाऱ्या देवी, आद्यशक्ती महेश्वरी,
योगातून उत्पन्न झालेल्या, योगसंभव महालक्ष्मी, तुला वंदन असो!
स्थूल आणि सूक्ष्म रूपे असलेल्या, महाआवेशी, महाशक्ती, महोदरी,
महापापे दूर करणाऱ्या देवी महालक्ष्मी, तुला वंदन असो!
पद्मासनस्थ, परब्रह्मस्वरूप,
परमेशी, जगन्माता महालक्ष्मी, तुला वंदन असो!
श्वेत वस्त्रे धारण करणाऱ्या देवी, नानाविध अलंकारांनी सुशोभित,
जगाचे पालन करणाऱ्या, जगन्माता महालक्ष्मी, तुला वंदन असो!
जो भक्तिमान मनुष्य महालक्ष्म्याष्टक स्तोत्राचे पठण करतो,
तो सर्व सिद्धी प्राप्त करतो आणि सदैव राज्य भोगतो.
जो मनुष्य दररोज एक वेळा हे पठण करतो, तो महापापांपासून मुक्त होतो,
जो दोन वेळा पठण करतो, तो धनधान्याने समृद्ध होतो.
जो मनुष्य हे स्तोत्र त्रिकाळ पठण करतो, त्याचे महाशत्रू नष्ट होतात,
महालक्ष्मी नेहमी प्रसन्न राहतात आणि शुभ वरदान देतात.
श्री इंद्रांनी रचलेल्या श्रीमहालक्ष्म्याष्टक स्तोत्राचे वाचन पूर्ण झाले.