रोजच्या रोज वाचली जाणारी स्तोत्रे आणि नित्य पूजेतील आरत्या सहज उपलब्ध व्हाव्यात, तसेच त्यांचे मराठीतील अर्थही सर्वांना समजण्यास सोपे व्हावेत, या उद्देशाने हा एक छोटासा प्रयत्न आहे.
स्तोत्रे, मंत्र, आरत्या व इतर धार्मिक ग्रंथांचे पाठ उपलब्ध करून देताना विविध पुस्तके, ग्रंथ आणि विश्वसनीय ऑनलाइन स्रोत यांचा संदर्भ घेतला आहे. वेगवेगळ्या स्रोतांमध्ये पाठभेद तसेच व्याकरण किंवा लेखनातील काही त्रुटी आढळून येतात. त्यामुळे उपलब्ध संदर्भांचा अभ्यास करून, शक्य तितका प्रमाणभूत, शुद्ध आणि सर्वमान्य पाठ देण्याचा प्रयत्न केला आहे. आवश्यक तेथे व्याकरणाच्या दृष्टीनेही पाठ तपासून दुरुस्त केला आहे.
यासोबतच स्तोत्रांचे मराठीतील अर्थ देण्याचाही प्रयत्न आहे. जसे जसे हे काम पुढे जाईल, तसे तसे नवीन स्तोत्रे, आरत्या आणि त्यांचे अर्थ उपलब्ध करून दिले जातील.
या प्रयत्नात आमच्याकडूनही अनवधानाने काही त्रुटी राहू शकतात. आपल्याला कोणत्याही स्तोत्राच्या पाठात, व्याकरणात, अर्थामध्ये किंवा इतर कोणत्याही बाबतीत त्रुटी आढळल्यास, कृपया ती आमच्या निदर्शनास आणून द्यावी. आपल्या सूचना व दुरुस्त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करू.