De Maj Aashirwad
देवीची प्रार्थना

दे मज आशीर्वाद अंबे, दे मज आशीर्वाद ।

जगदंबेच्या कौशल्याला आतुरले /आतुरलो मी तुझ्या दर्शना ।
तुझा ध्वनी हा मंदिरी निघता, सुख वाटे मज त्यात ॥१॥

सिहासनीं तू बैसोनी, सांग प्रार्थना करू कोणती ।
नयनी बघता आनंद मूर्ती, करुनी आरती वात ॥२॥

एका जनार्दनीं पूर्ण कृपेने, भक्त गर्जती अति प्रेमाने
जगदंबे तू प्रसन्नतेने, ठेऊनी मस्तकी हात ॥३॥