शुंभकरोती
शुभं करोती कल्याणम्
आरोग्यम् धनसंपदा
शत्रुबुध्दी विनाशाय
दीपज्योति नमोऽस्तुते ।
दिव्या दिव्या दीपत्कार
कानी कुंडल मोतीहार
दिव्याला पाहून नमस्कार ।
तिळाचे तेल कापसाची वात,
दिवा जळो सारी रात ।
दिवा लावला तुळशीपाशी,
उजेड पडला विष्णूपाशी
माझा नमस्कार सर्व देवांपाशी|
